![]() |
![]() |
![]() |
|||||||||
| राष्ट्रिय फॅशन तंत्र संस्था | |||||||||||
| परीचय | | नियमीत शिक्षण | | सातत्यपुर्ण शिक्षण | | |||||||||
|
|
|||||||||||
| शैक्षणिक | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
स्थानिक उद्योग आणि जागतिक उद्योगामध्ये सामावून जाण्याच्या दृष्टीने विद्यार्थी तयार होण्यासाठी निफ्टचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचे बहुविद्य शाखांचे ध्येय आहे. उद्योग आणि व्यापारामध्ये होणारे बदल विचारात घेवून शिक्षण तज्ञ आणि संबंधित उद्योगांतील तज्ञ यांचे कडून अभ्यासक्रमाचा आढावा घेण्यात येतो. निफ्ट ४ वर्ष कालावधीचे पदवी अभ्यासक्रम आणि २ वर्ष मुदतीचे डिझाईन व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील पाठयक्रम चालविते. शिक्षणशास्त्र : मूल्यमापनः महत्वाचे शैक्षणिक कार्यक्रमः शैक्षणिक भेटी : वर्गातील अभ्यास आणि प्रात्यक्षिके यांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने विद्यार्थी वेळोवेळी उद्योगांना भेट देतात. तसेच वस्तुसंग्रहालय, आर्ट गॅलरीज प्रदर्षने आणि व्यापार मेळे यांना भेटी देवून फॅषन क्षेत्रातील माहीती अद्ययावत ठेवतात. उद्योगातील उमेदवारी : उद्योगाचे पायाभूत आणि कार्यात्मक घटक समजून घेण्याच्या दृष्टीने विद्यार्थी ६ ते ८ आठवडयाची उमेदवारी करतात. उमेदवारीच्या काळात विद्यार्थ्यांना उद्योगाच्या परिस्थितीची वास्तव जाणीव होते. तसेच त्यांना प्रत्यक्ष प्रकल्प दिले जातात जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष वातावरणात निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करतात. अषा प्रकारची उमेदवारी विद्यार्थ्याचे आणि उद्योगाचे नाते दृढ करण्यास मदत करते. डिझाईन कलेक्षन/डिप्लोमा प्रोजेक्ट : पाठयक्रमाच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी जी कौषल्ये प्राप्त केली आहेत त्याचे प्रतिबिंब पदवी प्रकल्पामध्ये प्रकर्षाने दिसून येते. उद्योगाने प्रायोजित केलेल्या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना आव्हानात्मक व्यासपीठ उपलब्ध होते. |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||
![]() | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||