राष्ट्रिय फॅशन तंत्र संस्था
     
 
   
      आंतरराष्ट्रीय संबंध        
 
sign up for e-zine  
 
 

निफ्ट ही संस्था बहुशाखा आणि विद्यार्थ्यांना अद्ययावत  शिक्षण देणारी उच्च दर्जाचे गुणवत्ता केंद्र म्हणून पुढे आलेली आहे. जागतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने निफ्टने उत्कृष्ट दर्जाच्या नामवंत फॅषन संस्थांबरोबर सहकार्याचे करार केलेले आहे. उदा. युनिव्हर्सिटी ऑफ द आर्टस लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ लिड्स, डेमॉन्टफोर्ट युनिव्हर्सिटी यु.के., रेअरसन युनिव्हर्सिटी कॅनडा, रॉयल मेलबर्न इन्स्टिटयुट ऑफ टेक्नोलॉजी ऑस्ट्रेलिया, डोमस ऍकडमी, इटली आणि युनिव्हर्सिटी ऑफ फिलाडेलफिया यु.एस.अे या उदाहरणादाखल काही संस्था आहेत. निफ्टच्या या आंतरराष्ट्रीय संबंधामुळे विद्यार्थ्यांना नामवंत शिक्षण संस्थात परदेषी शिक्षण घेण्याची संधी मिळते. परदेशी शिक्षण घेण्याची संधी निफ्टच्या सर्व केंद्रातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना घेता येते. पदव्युत्तर पाठयक्रमातील सत्र तीन व चार तसेच पदवी पाठयक्रमातील सत्र सहा आणि सात यांनाही संधी मिळू शकते. तसेच निफ्टच्या या संबंधामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धा/परिसंवाद/संशोधन व्यासपीठ/ प्रदर्षने इत्यादी मध्ये सहभागी होता येते.

निफ्ट ही इंटरनॅशनल फाऊंडेशन ऑफ फॅषन टेक्नोलॉजी इन्स्टिटयुट या २६ फॅषन संस्थांनी स्थापन केलेल्या संस्थेची मुळसंस्थापक सदस्य संस्था आहे. शिक्षण पध्दती व्यावसायिक संकल्पना यांचे आदान- प्रदान होण्याच्या दृष्टीने निफ्टचे शिक्षक आंतरराष्ट्रीय मेळे, परिसंवाद, प्रदर्षने, परिषदा आणि व्यापारी प्रदर्शने इत्यादी मध्ये सहभागी होवून तेथील व्यापक अनुभव वर्गामध्ये देतात.

निफ्टच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक देवाण-घेवाण करण्याच्या संधी :

निफ्टच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय देवाण - घेवाणीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या दृष्टीने अभ्यासक्रमाची पुनःरचना करण्यात आलेली आहे. आदान - प्रदानाचा हा पर्याय विद्यार्थ्यांना पदवीस्तरावर सत्र ६ आणि ७ आणि पदव्युत्तर स्तरावर ३ आणि ४ सत्रांसाठी उपलब्ध होतो.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक देवाण - घेवाण संधीः

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक देवाण - घेवाण कार्यक्रमांतर्गत खालील पैकी 1 किंवा संयुक्त पर्याय खालीप्रमाणे उपलब्ध आहेत.

पर्याय एक
निफ्टच्या केंद्रामध्ये एका सत्रासाठी प्रवेष घेणे.
सत्र ६ किंवा ७ डिझाईन आणि टेक्नोलॉजी शाखा

पदवी कार्यक्रम

चौथे वर्ष      इलेक्टीव / फायनल कलेक्षन /ग्रज्युएषन प्रोजेक्ट

टॉइनींग/इंडस्ट्री इंटर्नषिप
टिडी    एफडी       सेन्टरवाईस      ऍपरल
तीसरे वर्ष    केडी   एलडी     स्पेषलाइजेषन   प्रोडक्षन 

क्राफ्ट आणि इंडस्ट्री इंटर्नषिप
दुसरे वर्ष  फॅषन ऍन्ड  फॅषन ऍन्ड  फॅषन ऍन्ड लाइफस्टाईल फॅषन      फॅषन
टेक्स्टाईल    ऍपरल      ऍक्सेसरीज          कम्युनिकेषन  प्रोडक्षन

पहिले वर्ष           फाऊंडेषन कोर्स

सेमिस्टर ३ व ४ पदवी  डिझाईन / मॅनेजमेंट/टैक्नोलॉजी

पदवी कार्यक्रम

सत्र ४        अंतिम संषोधन प्रकल्प

सत्र ३ रिसर्च बेसड् कोअर   कोअर कोर्सेस ऍन्ड इलेक्टिव  डिझाईन रिसर्च
कोर्सेस ऍन्ड इलेक्टीव  फॅषन इंडस्ट्री मार्केट     डेवलपमेंट ऍन्ड                     सर्वे                  प्रोजेक्ट इन
स्पेषलाइजेषन

टॉइनींग/इंडस्ट्री इंटर्नषिप
सत्र २ कोअर कोर्सेस ऍन्ड         कोअर कोर्सेस ऍन्ड  क्रिएटिव ऍन्ड टेक्निकल
इलेक्टिव फॉर स्पेषलाइजेषन   इलेक्टिव फॉर      डेवलपमेंट कोअर कोर्सेस
स्पेषलाइजेषन       इन  स्पेशलाइजेशन

सत्र 1  इंट्रोडक्टरी कोअर कोर्सेस,   इंट्रोडक्टरी कोअर ऍन्ड  कॉन्टेक्स्चुअल स्टडीज,
स्किल बेसड् कोर्सेसे ऍन्ड    मोडयुलर कोर्सेस       इंट्रोडक्टरी कोअर ऍन्ड           विंटर इंटर्नषिप                               मोडयुलर कोर्सेस

पीजी (टेक्नोलॉजी)           पीजी(मॅनेजमेंट)      पाजी (डिझाईन)

 

पर्याय दोन

गरजेनुरूप क्राफ्ट क्लस्टरच्या अभ्यासामुळे भारतीय हस्तकला आणि डिझाईन वारसा या बाबतची दृष्टी प्राप्त होण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळते. विषयतज्ञ आणि शिक्षक यांनी दिलेली व्याख्याने,कार्यषाळा आणि क्षेत्रभेटी यांचा यामध्ये समावेष असतो.