निफ्टच्या रोजगार परियोजना कक्ष पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याकरिता आणि उच्च पदावर कार्यरत होण्यास मदत करते. अग्रगण्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऍपरल कंपन्या निफ्ट मधुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची उच्च पदस्थ नोकयाकरिता निवड करतात. ब्लॅकबरीज, ग्लोबस, पॅन्टलुन, प्रोलाईन, एस् कुमार्स, टायटन, कार्बन, मदुरा गारमेन्टस् आणि या सारख्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये निफ्टच्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिलेला आहे. गॅप, ली ऍंन्ड फुंग, टॉमी हिलफिगर, ट्रायबर्ग, कोलबी, इम्पल्स-नेक्स्ट इत्यादी अग्रगण्य आयातगृहांमधुन निफ्ट उत्तीर्ण विद्यार्थी महत्वाचे निर्णय घेतले जातात अशा पदांवर आहेत.
मुंबई, दिल्ली, बॅंगलोर येथे झालेल्या निफ्ट रोजगार परियोजना, जानेवारी २००७ अंतर्गत निफ्टमधुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यावर इंडस्ट्रीचा वाढता विश्वास दिसुन आला आहे. या परियोजनेत साधारण १०० कंपन्यांनी सहभाग घेवून ०९ दिवसांमध्ये सुमारे ६०० विद्यार्थ्यांना नोकया दिल्या.
संस्थेच्या हुशार पदवीधारकांमुळे इंडस्ट्रीमध्ये लार्ज रिटेलर (मोठे किरकोळ व्यापारी), ब्रॅंन्ड र्माकेटस्, मॅन्युफॅकचर्रस्, सल्लागार समित्या, वस्त्र गिरण्या, होम फर्निशिंग कंपन्या, डिझाईन बिपिओस, तंत्रज्ञान सोल्युशन देणाया मोठया ऍपरल बनविण्याया कंपन्या या बरोबर इतर आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या कंपन्या कॅम्पस भरतीसाठी भेटी देतात.
यातील अनेक डिझाईन आणि प्रौद्योगिक शाखेतील विद्यार्थी मॅन्युफॅकचर - एक्सपोर्टर (निर्यातदार) यांच्याकडे नोकरीला लागलेले आहेत. तसेच फॅशन प्रबंधन विद्यार्थी प्रामुख्याने किरकोळ व्यापारी तसेच ब्रॅण्ड ओनरसकडे नोकरी मिळविण्यात यशस्वी झालेले आहेत.
|